Our Goal Is Your Goal
Success

Saturday 15 November 2014

स्पर्धा परीक्षा: समज गैरसमज

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) व राज्य लोकसेवा आयोग (MPSC) यांच्याकडून दरवर्षी विविध उच्च पदांसाठी परीक्षा घेतली जाते.या परिक्षांबद्दल अनेक समज गैरसमज प्रचलित आहेत. याविषयी थोडे सविस्तर.
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) व राज्य लोकसेवा आयोग (MPSC) यांच्याकडून दरवर्षी विविध उच्च पदांसाठी परीक्षा घेतली जाते त्यातून निवड झालेले IAS, IFS, IPS,
DYSC, DYS Collecto अशा महत्त्वाच्या स्थानी विराजमान होतात. या परिक्षांबद्दल अनेक समज गैरसमज प्रचलित आहेत. बर्‍याचवेळा समजंापेक्षा गैरसमजच अधिक. पुढील लेखात त्यातील काहींचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला आहे.
१) गैरसमज- या परिक्षांसाठी पदवीनंतर तयारी सुरू करायची असते.
वस्तुस्थिती- या परिक्षांसाठी पदवी हा जरी निकष असला तरी तयारी आधीपासून करणे फायद्याचे ठरते. अगदी शालेय जीवनापासून सुरूवात करता येते. कॉलेजमधल्या विद्याशाखेची निवड देखील त्यानुसार करता येते.
२)गैरसमज- या परिक्षांसाठी विद्यापिठीय परिक्षेत भरपूर गुण आवश्यक असतात.
वस्तुस्थिती- फक्त पदवी ही पात्रता आहे, किती टक्के गुण मिळवले किंवा किती वर्ष लागले याने फरक पडत नाही.
३) गैरसमज- सूर्याखालचे काहीही विचारतात
वस्तुस्थिती- सुस्पष्ट अभ्यासक्रम दिलेला असतो, त्याप्रमाणे अभ्यास करावा लागतो.
४) गैरसमज- इंग्रजी भाषेवर प्रभुत्व लागते.
वस्तुस्थिती- खअड साठी असणारी परिक्षा देखील पूर्णपणे मराठीत देता येते अगदी मुलाखतीसकट इंग्रजीचा पेपर देखील असतो पण त्याची काठिण्य पातळी फारशी नसते.
५) गैरसमज- अक्षर सुंदर असावे लागते.
वस्तुस्थिती- शुध्द व वाचण्याजोगे असले पाहिजे. सुंदरता सापेक्ष असते.
६) गैरसमज- अठरा तास अभ्यास करावा लागतो.
वस्तुस्थिती- आठ ते दहा तास अभ्यास पुरतो शेवटी किती वाचले यापेक्षा किती लक्षात राहिले हे महत्त्वाचे.
७) गैरसमज- पाण्यासारखा पैसा मोजावा लागतो.
वस्तुस्थिती- दहावी/बारावीला जेवढा आपण खर्च करतो त्यापेक्षा कमीच लागतो. तो ही प्रामुख्याने पुस्तके व मार्गदर्शन वर्ग यांचा असतो, जो कधीच वाया जात नाही.
८) गैरसमज- खूप वर्षे लागतात.
वस्तुस्थिती- योग्यरीतीने नियोजन केले तर एका वर्षात पद काढता येते. अनेकांनी याप्रकारे काढून दाखवले आहे.
९) गैरसमज- पद असेल तर ओळख असावी लागते.
वस्तुस्थिती- नक्कीच ओळख लागते, अभ्यासाशी व स्वतःशी
१०) गैरसमज- नशिबाचा यशामध्ये मोठा भाग असतो.
वस्तुस्थिती- हा एक सापेक्ष समज आहे. इंग्रजी म्हण आहे की, “Harder I work, I found myself more lucky’
११) गैरसमज- मुलींनी या क्षेत्रात पडू नये.
वस्तुस्थिती- उलट सरकार हा उत्कृष्ट मालक असतो व सोयीसुविधा कुठेही अडचण येऊ देत नाहीत. राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत एक तृतीयांश जागा मुलींसाठी राखीव आहेत.
१२) गैरसमज- सरकारी सेवांमधून खाजगी क्षेत्रात परतता येत नाही.
वस्तुस्थिती- नक्कीच परतता येते किंबहुना खाजगी क्षेत्र स्वागत करते. सरकारी क्षेत्रात प्राप्त झालेला व्यापक अनुभव खाजगी क्षेत्रात काम करताना उपयोगी पडतो.
१३) गैरसमज- पूर्णवेळ अभ्यास करावा लागतो.
वस्तुस्थिती- पूर्णवेळ अभ्यास करून एक घाव, दोन तुकडे करता आले तर उत्तम, पण नोकरी करूनही अभ्यास करता येतो, तशी अनेक उदाहरणे आहेत.
१४) गैरसमजः खाजगी क्षेत्राइतका पगार सरकारी सेवांमध्ये नसतो.
वस्तुस्थिती- पण दुसरीकडे सरकारी सेवांमधील स्थैर्य व सुरक्षा खाजगी क्षेत्रात नसते. सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर सरकारी सेवांमधील पगार खाजगी क्षेत्राशी समकक्ष झाले आहेत.
१५) गैरसमज- राजकीय दबावाला तोंड द्यावे लागते.
वस्तुस्थिती- खाजगी क्षेत्रात जसा बॉसचा दबाव असतो तसाच हा प्रकार आहे. राजकारण्यांवरही लोकांचा दबाव असतो तेव्हा सकारात्मक दृष्टीने बघितल्यास हा दबाव कार्यक्षमतेस चालनाच देतो.
१६) गैरसमज- सारखी बदली होते.
वस्तुस्थिती – तीन वर्षातून एकदा होते व प्रत्येकवेळी कुठे उचलून कोपर्‍यात टाकत नाहीत तर बदली हा प्रशासकीय पध्दतीचा एक भाग आहे.
१७) गैरसमज- सरकारी सेवा म्हणजे पैशाची खाण असते.
वस्तुस्थिती- कुंपणच शेत खाऊ लागले तर कितीही खाऊ शकते पण मग सरकारी सेवेत यायचे ते कशासाठी ते ही स्पष्ट असले पाहिजे.
प्रत्येक भ्रष्टाचारी माणसाची कधी ना कधी अण्णा हजारेंशी गाठ पडतेच पडते. गैरसमजांच्या धुक्यातून बाहेर पडून वस्तुस्थितीचा वेध घेतल्यास मराठी तरुणांना हे आकाश खुले आहे.

No comments:

Post a Comment